मकर संक्रमण म्हणजे
‘स्व’ – रूपवर्धिनीच्या निष्काम समर्पित सेवाकार्याचे एक रसाळ फळ. यावर्षी २ फेब्रुवारीला जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियमला वर्धिनीच्या मनुष्य जडणघडणीच्या उपक्रमांचा अनोखा संगम मैदानी साहसी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पाचशेहून अधिक वर्धक वर्धिकांनी उपस्थितांसमोर सादर केला.
मा. तेजस्विनी सावंत (जागतिक विजेतेपद मिळवणाऱ्या महिला नेमबाज) आणि श्री राजीव नंदकर (उपायुक्त, पुणे महानगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला सर्वांकडूनच कौतुकाची दाद मिळाली.
ओंकार प्रकल्पाच्या ‘श्रीराम दर्शन’ या कल्याणी विशेषांकाचे प्रकाशन व वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार वितरण २२ जानेवारी २०२५ या दिवशी झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी विख्यात निरुपणकार डॉ. सौ. धनश्री ताई लेले यांनी अंकाचे मार्मिक विवेचन करत रामकथेतुन श्रीरामांचे दर्शन उपस्थितांना घडवले. यावर्षीचा वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार जव्हार च्या डोंगराळ भागात कार्य करणाऱ्या वयम् या संस्थेस देण्यात आला.
सदर कार्यक्रमात डॉ सौ धनश्री ताई यांनी मांडलेल्या विचारांची ध्वनीचित्रफीत
(‘श्रीराम दर्शन’ विशेषांक ‘स्व’ – रूप वर्धिनी कार्यालयात उपलब्ध आहे)
दरवर्षी सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय चारित्र्य सार्वजनिक शिस्त कार्यकर्त्यांची जडणघडण अशा उद्देशाने संघटित रित्या पुढील कार्यक्रम होतात.
चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी ओंकारेश्वर मंदिरात सकाळी सहा वाजता सामूहिक उपासनेला सर्व कार्यकर्ते उपस्थित असतात यानंतर अभ्यासू वक्त्यांचे सर्वांना मार्गदर्शनपर व्याख्यान होते.
१४ एप्रिलला विधायक स्वरूपात रक्तदान यज्ञाचे आयोजन करून जयंती साजरी होते याची सुरुवात १८-१२-१९८३ ला झाली.
सर्व प्रकल्पातील विद्यार्थी कार्यकर्ते या वार्षिक उत्सवात सहभागी होतात मैदानी व सांस्कृतिक विषयानुसार सादरीकरण केले जाते.