'Swa'-Roopwardhinee

Skill Development Center

Home
Skill Development Center
समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र

च-होली बुद्रुक येथे बहुआयामी प्रशिक्षण संकुलाच्या तीन मजली इमारतीचे एप्रिल २०२३ मध्ये उद्घाटन झाले. या इमारतीत ग्रामीण भागातील युवक, युवती, आणि महिलांसाठी आरोग्य विषयातील विविध कौशल्य आधारित शासनमान्य अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून स्थानिकांना त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची आणि रोजगाराच्या संधी मिळवण्याची संधी मिळाली आहे. शाखा विस्तार वर्धिनीच्या व्यक्तिमत्त्व विकसनाच्या मुख्य प्रकल्पाचा विस्तार पुण्यात व पुण्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची कल्पना आहे. या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि त्याचे यशस्वी परिणाम दिसत आहेत. सध्या सातारा आणि नाशिक येथे शाखांचा विस्तार झाला आहे, ज्यामुळे अधिकाधिक लोकांना या प्रकल्पाचा लाभ घेता येईल.

संस्थेची पार्श्वभूमी

पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या कमकुवत समाज घटकातील गुणी मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने १९७९ साली स्थापन झालेल्या संस्थेचे चऱ्होली येथे हे विस्तार केंद्र उभे राहिले आहे. पुणे येथे संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे अनौपचारिक शैक्षणिक प्रकल्प आणि उपक्रम चालविले जातात. यामध्ये बालवाडी, शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी चालणारे एकात्मिक विकास केंद्र, तरुण मुलामुलींसाठी स्वयंअध्ययन केंद्र, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालणारी फिरती विज्ञान तंत्रज्ञान प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गरजू महिलांसाठी विविध उद्योग शिक्षण वर्ग असे अनेक प्रकल्प आणि उपक्रम आहेत. या सर्व प्रकल्पांचा हजारो जणांना गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ लाभ मिळतो आहे.

मोठ्या विस्ताराच्या दिशेने वळताना

समाजातील गरजू मुली आणि महिला यांना उद्योगशिक्षण वर्गांच्या माध्यमातून १९८९-९० पासून संस्थेने जे साह्य केले त्याचा अतिशय अभिमान वाटावा असा परिणाम शेकडो घरांमधून अनुभवता आला. ५००० हून अधिक महिला आत्मनिर्भर होऊ शकल्या आहेत. एका आत्मनिर्भर मुलीमुळे किंवा महिलेमुळे संपूर्ण घराला सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतात. संपूर्ण घराला सुखाचा सहवास मिळायला लागतो. हे लक्षात घेऊन सर्व विश्वस्तांनी उद्योगशिक्षण विषयासाठी एक स्वतंत्र केंद्र उभे करण्याचे ठरवले. या पार्श्वभूमीवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पुरुषोत्तमभाई श्रॉफ यांनी त्यांची चऱ्होली बुद्रुक येथे असलेली एक एकर जागा २००७ साली संस्थेला दानपत्राने दिली आणि मोठ्या विस्ताराचे पाऊल पुढे पडले.

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे वैशिष्ट्ये

विविध अभ्यासक्रम

ऑपरेशन थियेटर तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड आणि हेल्थ इन्फर्मेशन तंत्रज्ञ, फॅशन डिझायनिंग डिप्लोमा, फिजिओथेरपी डिप्लोमा.

व्यापक क्षेत्रीय लाभ

चहोली आणि आसपासच्या परिसरातील निवासी क्षेत्रांतील लोकांना व्यावसायिक कौशल्ये मिळवण्याचा फायदा.

तपासलेले व मान्यताप्राप्त प्रशिक्षण

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची मान्यता प्राप्त बांधकाम व प्रशिक्षण सुविधा.

उद्योगशिक्षणाचा मोठा प्रभाव

५०००+ महिलांची आत्मनिर्भरता, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात सकारात्मक बदल घडले आहेत.

उत्कृष्ट सुविधा

तीन मजल्यांचे प्रशिक्षण संकुल, आधुनिक शिक्षण व संसाधन सुविधा.

प्रस्तावित नवे प्रकल्प

अग्निवीर आणि कथ्थकनृत्यवर्ग या नवे उपक्रम, ज्यामुळे प्रशिक्षण क्षेत्रात आणखी वाढ होईल.

सर्टिफिकेट कोर्स

जनरल नर्सिंग व मिडवायफरी असिस्टंट

ऑपरेशन थिएटर टेक्निशियन

डिप्लोमा इन फिजिओथेरपिस्ट

मेडिकल रेकॉर्ड व हेल्थ इन्फॉर्मेशन टेक्निशियन

कथ्थक नृत्य प्रशिक्षण वर्ग

रोबोटिक्स

आरोग्य सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम

फॅशन डिझायनिंग डिप्लोमा

रुपरंग वा असो गंधही | यातील माझे काहीच नाही |
श्रेयाचा मज नको लेशही | निर्माल्यात विरावे ||
विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे ||
संपर्क

Call us

+९१ ९०११३८६३८६

Mail Us

relations@swaroopwardhinee.org

Time

सकाळी 11 ते संध्याकाळी 6

पत्ता

'स्व' रूपवर्धिनी 22/1, मंगळवार पेठ, पारगे चौक, बारणे रोड पुणे - 411011, महाराष्ट्र, भारत.

©2024 ‘Swa’-Roopwardhinee | All Rights Reserved. Made with 🤍 by the Social Digital Wings.