'Swa'-Roopwardhinee

Events

Home
Events

PAST EVENTS

मकर संक्रमण उत्सव २०२५

मकर संक्रमण म्हणजे
‘स्व’ – रूपवर्धिनीच्या निष्काम समर्पित सेवाकार्याचे एक रसाळ फळ. यावर्षी २ फेब्रुवारीला जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियमला वर्धिनीच्या मनुष्य जडणघडणीच्या उपक्रमांचा अनोखा संगम मैदानी साहसी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पाचशेहून अधिक वर्धक वर्धिकांनी उपस्थितांसमोर सादर केला.  
मा. तेजस्विनी सावंत (जागतिक विजेतेपद मिळवणाऱ्या महिला नेमबाज) आणि श्री राजीव नंदकर (उपायुक्त, पुणे महानगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला सर्वांकडूनच कौतुकाची दाद मिळाली.

कल्याणी विशेषांकाचे प्रकाशन

ओंकार प्रकल्पाच्या ‘श्रीराम दर्शन’ या कल्याणी विशेषांकाचे प्रकाशन व वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार वितरण २२ जानेवारी २०२५ या दिवशी झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी विख्यात निरुपणकार डॉ. सौ. धनश्री ताई लेले यांनी अंकाचे मार्मिक विवेचन करत रामकथेतुन श्रीरामांचे दर्शन उपस्थितांना घडवले. यावर्षीचा वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार जव्हार च्या डोंगराळ भागात कार्य करणाऱ्या वयम् या संस्थेस देण्यात आला.
सदर कार्यक्रमात डॉ सौ धनश्री ताई यांनी मांडलेल्या विचारांची ध्वनीचित्रफीत
(‘श्रीराम दर्शन’ विशेषांक ‘स्व’ – रूप वर्धिनी कार्यालयात उपलब्ध आहे)

राष्ट्रीय सण आणि ध्वजवंदन कार्यक्रम

दरवर्षी सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय चारित्र्य सार्वजनिक शिस्त कार्यकर्त्यांची जडणघडण अशा उद्देशाने संघटित रित्या पुढील कार्यक्रम होतात.

वर्षारंभ उपासना आणि मार्गदर्शन सत्र

चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी ओंकारेश्वर मंदिरात सकाळी सहा वाजता सामूहिक उपासनेला सर्व कार्यकर्ते उपस्थित असतात यानंतर  अभ्यासू वक्त्यांचे सर्वांना मार्गदर्शनपर व्याख्यान होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रक्तदान शिबिर

१४ एप्रिलला विधायक स्वरूपात रक्तदान यज्ञाचे आयोजन करून जयंती साजरी होते याची सुरुवात १८-१२-१९८३ ला झाली.

संक्रांत उत्सव आणि वार्षिक सांस्कृतिक सादरीकरण

सर्व प्रकल्पातील विद्यार्थी कार्यकर्ते या वार्षिक उत्सवात सहभागी होतात मैदानी व सांस्कृतिक विषयानुसार सादरीकरण केले जाते.

गणेशोत्सव: सामाजिक जागर आणि सांस्कृतिक सादरीकरण

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात तरुणांच्या शक्तीला चांगली दिशा देण्यासाठी व उत्सवाचा हरवलेला सामाजिक आशय मिळवून देण्याच्या उद्देशाने मिरवणुकीत लेझीम टिपरी झांज मल्लखांब ध्वज ढोल ताशा यांच्या पथकांचा सहभाग सुरू झाला हुंडाबळी स्त्रीभ्रूणहत्या व्यसनमुक्ती पर्यावरण साक्षरता अशा विषयांवरील पथनाट्याद्वारे जनमानसांचे जागरण या उपक्रमात सर्ववर्धक कार्यकर्ते सहभागी होतात.
 
रुपरंग वा असो गंधही | यातील माझे काहीच नाही |
श्रेयाचा मज नको लेशही | निर्माल्यात विरावे ||
विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे ||
संपर्क

Call us

+९१ ९०११३८६३८६

Mail Us

relations@swaroopwardhinee.org

Time

सकाळी 11 ते संध्याकाळी 6

पत्ता

'स्व' रूपवर्धिनी 22/1, मंगळवार पेठ, पारगे चौक, बारणे रोड पुणे - 411011, महाराष्ट्र, भारत.

©2024 ‘Swa’-Roopwardhinee | All Rights Reserved. Made with 🤍 by the Social Digital Wings.