असे म्हणत वर्धिनीच्या युवा गटाने कोविडच्या काळात उल्लेखनीय काम केले. संस्कार, समृद्धी ,संवेदना आणि संघटन या ध्येय सूत्राने प्रेरित असणारा युवा विभाग म्हणजे वर्धनशील कर्तृत्व घडविणारे संघटन आहे. या संघटनेतून तयार होणारा कार्यकर्ता हा विकसित व्हावे ,अर्पित होऊन जावे’ या ब्रीदवाक्याला साजेसा असायला हवा याबाबत वर्धिनीचा नेहमी आग्रह असतो. वर्धिनीच्या कामाचा गाभा असणारा शाखा विभाग , ताकदीने आणि गुणवत्तेने फुलवणारा कार्यकर्ता म्हणजेच आजची वर्धिनी ची युवा शक्ती. या शक्तीला दिशा देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या विचार मंथनातून विभागाची रचना निश्चित करण्यात आली .निर्माण शाखा, नेतृत्व शाखा, आणि प्रेरणा शाखा या तीन टप्प्यांवर विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट ठरवून युवक- युवती गटावर काम केले जाते .
निर्माण शाखा अर्थातच व्यक्तिमत्व घडवण्याच्या घडवण्याचा टप्पा. यामध्ये अकरावी बारावी मधील 16 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो.
नेतृत्व शाखेच्या टप्प्यात 18 ते 25 वयोगटातील युवांच्या शैक्षणिक प्रगती आणि कौशल्यवर्धन यावर काम केले जाते.
प्रेरणा शाखेच्या टप्प्यामध्ये 25 वर्षांपुढील सर्व कार्यकर्त्यांना संघटन आणि समर्पण यासाठी काम करण्याचे आवाहन केले जाते. या तीनही टप्प्यांमध्ये कार्यकर्ता संघटनेला बळ देत असतो.
रुपरंग वा असो गंधही | यातील माझे काहीच नाही |
श्रेयाचा मज नको लेशही | निर्माल्यात विरावे ||
विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे ||